पॅचवर्क फ्रेम -  

पॅचवर्क फ्रेम - साड्यांच्या काही चांगल्या डिझाइन्समधून तुकडे कापून त्याचं छानसं पॅचवर्क करता येईल . हे तुकडे एका मजबूत कॉटनच्या कापडावर कलाकुसरीनं । शिवून घ्यावेत . हे पॅचवर्क फ्रेम करून भिंतीवर स्पॉटलाइटच्या खाली लावता येईल . 

रजई - 

वापरात नसलेल्या तीन - चार - साड्या एकावर एक ठेवून त्या काठांवर शिवून घ्याव्यात . साडीची लांबी जास्त असते ,त्यामुळे एक साडी एकदा फोल्ड होऊन ती दुपदरी होईल . अशा प्रकारे ३ - ४ साड्या वापरल्यास चांगली जाडजूड रजई तयार होईल . या साड्या शक्यतो कॉटनच्या असाव्यात .

उशी कव्हर - 

          जरीकाठाच्या सुती साड्या कुशन कव्हरसाठी अगदी परफेक्ट असतात . सोनेरी काठाच्या सिल्क आणि सिल्क - कॉटन साड्यांपासूनही कुशन कव्हरचा देखणा सेट तयार होतो . एक साडी यासाठीपुरेशी होणार नाही , असं वाटल्यास लोडच्या कुशनसाठी वेगळी आणि उशांसाठी वेगळी साडी वापरता येतील . उत्तम रंगसंगती साधल्यास उत्तम एथनिक दिवाण सेट तयार होऊ शकतो . 

बुकमार्क्स  -

        जुन्या विरलेल्या किंवा फाटलेल्या साडीचे जरीचे काठ बुकमार्क्स तयार करण्यासाठी वापरता येतात . या काठाचे आयताकृती छोटे तुकडे करून हे तुकडे कार्डबोर्डवर चिकटवावेत . एका बाजूला पंच करून भोक पाडून घ्यावं तिथून सॅटिनची रिबिन ओवली की झाला बुकमार्क तयार . कुर्ती शिवल्यानंतर उरलेल्या काठांच्या तुकड्यांचाही यासाठी वापर होऊ शकतो .