अक्कलकाऱ्याच फायदे | INFORMATOR 24 | Sojwal patil
अक्कलकाऱ्याची झाडे लहान असून त्यास पिवळी फुले येतात . ती खाली असता जीभ विरविरते . जिभेस मुंग्या येतात आणि तशा मुंग्या आल्या हणजे लाळ सुटून जीभ हलकी होते . कोणतेही कारणाने जीभ जड झाली तर , ही फले खाल्ल्याने जडपणा कमी होतो . ह्या झाडाच्या मुळांस अक्कलकारा असे म्हणतात . ती बाजारात सर्वत्र मिळतात . जिभेवर मुळी टाकली म्हणजे जीभ विरविरते . लहान मुलांच्या जिभेचा जडपणा व बोबडेपणा जाण्यास अक्कलकायाचे वस्त्रगाळ चूर्ण दोन चिमट्या मधाबरोबर चाटण्यास द्यावे . जडपणा कमी होतो आणि मुले स्पष्ट बोलू लागतात .
लहान मुलांचे अपस्मारावर ( आकडीवर ) हे चांगले औषध आहे . ह्याचे वस्त्रगाळ चूर्ण दोन चिमट्या मधाबरोबर सांजसकाळ द्यावे , आकडी कमी होते . वायूमुळे डोके फिरत असल्यास किंवा झोप येत नसल्यास अक्कलकाऱ्याच्या मुळ्या तोंडात धराव्या व त्याचा रस गिळीत जावा , झोप येते . सर्दी , पडसे झाले असेल तर त्याची एक लहानशी कांडी विड्यात घालून खावी , पडसे कमी होते . असा विडा खाल्ला असता हिवतापही कमी होतो . पाळीचा ताप म्हणजे एकांत्रा , चौथरा असा येत असेल तर चांगला सुंदर विडा करून त्यात अक्कलकारा घालून देतात . तापाची पाळी चुकते . विड्यात अक्कलकारा घालणे तो एक ग्रॅम घालावा .
अक्कलकाऱ्याने सूजही कमी होते . अक्कलकाऱ्याच्या कांड्या पाण्यात उगाळून ऊन करून त्यांचा दाट लेप सुजेवर लावावा व पोटात त्याचे चूर्ण घ्यावे . याने सूज कमी होते . दात , दाढ , दुखत असल्यास अक्कलकारा दाताखाली धरावा , दु : ख कमी होते .मोठ्या प्रमाणात व बराच काळ अक्कलकारा सेवन केल्यास आतड्याची श्लेष्मलता जखमेने मरते .
आम्लपित्ताचे रुग्ण तसेच ज्यांचे तोंडात फोड आले आहेत असे रोगी यांनी अक्कलकाऱ्याचा उपयोग करू नये . श्वासावरोधात अक्कलकायचे चूर्ण हुगल्याने वा घेताना येणारा अडथळा दूर होतो हलके , ताजेतवाने वाटते . वायुचे दुखण्यात ह्याचा लेप लावला असता दु : ख दूर होते . अक्कलकायाचे मुळ्यात भेसळ करण्यात येते . बाजारात खरा व खोटा , नकल असे दोन प्रकार मिळतात .

Post a Comment
0 Comments