अभ्यासशाखेची डिग्री मिळवणं , ही गोष्ट अवघड नसते . अवघड असते ते तिचा योग्य वापर करून यश मिळवणं . शाळा - कॉलेजच्या चार भिंतीमध्ये मिळवलेलं शैक्षणिक यश आणि बाहेरच्या व्यावहारिक जगाशी सामना करीत वास्तव जगातलं टिकाऊ यश यात फरक असतो . बुद्धीबरोबर चातुर्य आणि युक्ती तसंच योग्य वर्तन यांचा उपयोग करून या प्रकारचं यश मिळवावं लागतं . आणि ते मिळवण्यासाठी बुध्यांकापेक्षा प्रभावी व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता असते . टिपटॉप , मॉडर्न , कडक इस्त्रीचा पोशाख आणि कॉस्मेटिक्स वापरून शोभिवंत केलेला चेहरा नव्हे . या गोष्टींची काही प्रमाणात नक्कीच मदत होते . मात्र व्यक्तिमत्त्व विकसित होतं - संस्कार , वाचन , आजुबाजूच्या जगाचं निरीक्षण व परीक्षण यांच्यातून , थोडक्यात म्हणजे आधी चांगलं माणूस बनणं महत्त्वाचं आहे . चांगल्या सवयी आत्मसात करणं आवश्यक आहे .
        जगात उघड्या डोळ्यांनी वावरा . इथे चांगली माणसं आहेत ; पण वाईट माणसंही आहेत , त्यांच्यापासून सावध राहा . ही माणसं वरपांगी खूप गोड वागतात - बोलतात ; पण त्यामागे काही ना काही स्वार्थ असतो . अशा माणसांच्या खोट्या स्तुतीला भुलू नका . कोणत्याही प्रशंसेचा आनंदानं स्वीकार करा ; पण त्यातला ५० टक्के भागच ग्राह्य समजा . ती तुमच्या कामाची पावती आहे . ; पण तिच्याबरोबर कामाचा दर्जा वाढवण्याची जबाबदारी येते , हे विसरू नका . कोणत्याही माणसाशी फार घनिष्ठ संबंध ठेवू नका , त्यामुळे अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत , तर तीव्र निराशा होते . कडवटपणा येतो . ठरावीक वयानंतर स्वतंत्रपणे काम करावं लागतं . राव लागत . स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतात . घरात आईवडील आणि शाळेत शिक्षक पदोपदी सल्ला देण्यासाठी , मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात पण ठरावीक वयानंतर , विशेषतः नोकरी करताना , स्वतःखेरीज कुणावरही अवलंबून राहता येत नाही . या परिस्थितीत कुणाच्याहीहातन चुका होतात . ( आणि सतत काम करून माणूस अनुभवी बनतो तेव्हा त्या कमी होत जातात . ) त्यामुळे घाबरू नका . सहकाऱ्यांना वरिष्ठांना त्याबद्दल सामोरे जाताना चुका प्रांजळपणे कबूल करा आणि माफी मागा . त्यामुळे तुमचा जबाबदारी आणि प्रामाणिक वृत्ती स्पष्ट होते आणि दुसऱ्याचा विरोध बोथट होतो .
             कामाच्या ठिकाणी अथवा इतरत्र कुठेही वाद झाले तरी शांत राहा . संयम कधीही सोडू नका ; तोल जाऊ देऊ नका . छोट्यामोठ्या वादामुळे तुमच्या प्रगतीमार्गात बाधा येणार नसते . वाद होतील तेव्हा दुसऱ्यांचे मुद्दे समजून घ्या . विरोधक म्हणजे तुमचा शत्रू नव्हे . त्याच्या बोलण्यात तथ्य असू शकतं . ते असेल , तर स्वीकारा . त्यात कमीपणा नाही . वाद होणं म्हणजे विचारांची देवाणघेवाण . विचारस्वातंत्र्याचा आविष्कार . वाद करायला घाबरू नका ; पण वादासाठी वाद करू नका . समोरच्या व्यक्तीला खुमखुमी आली म्हणून वाद करीत असेल , तर तिला अडवू नका ; पण बोलणं वाढवू नका . वादविवादात व्यक्तिगत होऊ नका . दुसऱ्याच्या उण्यादुण्याची व्यंगाची ( उदाहरणार्थ काळ्या रंगाची , लठ्ठपणाची ) टर उडवू नका . समोरचा माणूस त्या हीन पातळीवर गेला , तर एकच भीमटोला लगावा - आणि तो म्हणजे उपेक्षेचा . बोलणं थांबवून तुम्ही तुमचं काम सुरू करा . हीन दर्जाच्या टीकेबद्दल सायरस चिंग या विचारवंतानं काय । म्हटलंय लक्षात ठेवा , ' डुकराशी मारामारी करायची नाही असं मी केव्हाच ठरवून टाकलंय .
        डुक्कर चिखलात रमतं . त्याच्याशी भिडाल तर तुमचे कपडे , तुमचं शरीर खराब होईल आणि त्याचा डुकराला दुप्पट आनंद होईल ! तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता ; जिथे काम करता तिथल्या लहान अथवा मोठ्या कणाही व्यक्तीबद्दल कुचाळक्या , चहाड्या ( गॉसिप ) करू नका . तुमचे मित्र / सहकारी तसं करीत असतील , तर तुम्ही त्यात सामील होऊ नका . लक्षात ठेवा , तुमच्या अनुपस्थितीतरीतही माणसं तुमचीही टवाळी करीत असतात . त्यांना खाद्य पुरवू नका . संधी देऊ नका .
            कुचाळक्या करणं म्हणजे खोटं बोलणं , खोटं बोलणारा माणूस कामात वाकबगार नसतो आणि त्याला काम करण्याची इच्छा नसते . आपल्या कामावर प्रेम करणाऱ्या माणसाला इतरांच्या उठाठेवी करायला वेळच नसतो . गॉसिप करणाऱ्या माणसाजवळ स्वतःचं मन नसतं . स्वतंत्र विचार नसतात . दुसऱ्याबद्दलच्या मत्सरापोटी ( आणि स्वतःची अपात्रता लपवण्यासाठी ) तो खोटंनाटं बोलतो . चारित्र्यहनन करतो . दुसऱ्याला आयुष्यातून उठवू बघतो . अशा माणसाशी संबंध ठेवू नका . प्रामाणिकता आणि लबाडी दोन्ही सवयी अशा आहेत ज्या सहजपणे लागतात आणि सहजपणे संपू शकतात . प्रामाणिकपणाची सवय जोपासा आणि अप्रामाणिकपणाला आयुष्यात थाराच देऊ नका . प्रामाणिक , कार्यक्षम , आपल्या कामावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या । संगतीत रहा , म्हणजे प्रामाणिकपणा जोपासला जाईल .

र एक गोष्ट लक्षात ठेवा अभ्यास सर्वकाही नाही

Thanks for reading whole article 
                               
                                             - SOJWAL